HATHRAS. 
देश

Hathras Case: चारही आरोपींवर बलात्कार आणि हत्येचा आरोप; CBIकडून चार्जशीट दाखल

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशच्या हाथरस (Hathras Case) येथील एका दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याप्रकरणी सीबीआयने चारी आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप लावला आहे. हाथरस प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने शुक्रवारी एका कोर्टासमोर चार्जशीट दाखल केली. चार्जशीटमधून ही माहिती समोर आली आहे. आरोपींचे वकील मुन्ना सिंह पुंढीर यांनी म्हटलं की सीबीआय ने चारी आरोपी संदीप, लवकुश, रवी आणि रामूवर बलात्कार आणि हत्येचा आरोप लावला आहे. वकीलांनी सांगितल्यानुसार सीबीआयने आरोपींविरोधात एससी/एसटी कायद्याअंतर्गत आरोप लावले आहेत. 

नाराज नेत्यांना सोनिया गांधी भेटणार; काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीत आणखी काय...

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये 14 सप्टेंबर 2020 मध्ये एका दलित तरुणीचा बलात्कार करण्यात आला होता. कथित उच्च जातीच्या लोकांनी मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. पीडितेला उपचारासाठी दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. पण, काही दिवसांनी पीडितेचा मृत्यू झाला. 30 सप्टेंबर रोजी मोठ्या फौजफाट्याच्या उपस्थितीत रात्री अडिचच्या सुमारात पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. 

पोलिसांनी कुटुंबीयांची परवानगी न घेता मुलीचे अंत्य संस्कार केल्याच आरोप करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांना मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते. या घटनेमुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले होते. विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. काँग्रेससह अनेक विरोध पक्ष पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी हाथरस येथे गेले होते. ऑक्टोबरमध्ये सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाच्या देखरेखेखाली सीबीआय या प्रकरणाचा तपास करेल, असे निर्देश दिले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! पंधरा दिवसांत दुसरी भाववाढ; मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

Jalgaon: अटक न करण्यासाठी मागितले ३० हजार, लाच प्रकरणी PSI वर गुन्हा दाखल

Latest Marathi Update Live: पुण्यात विषारी दारुचा आणखी एक बळी

Tukaram Mundhe अ‍ॅक्शन मोडवर... पतंजली संबंधित औषधांचा साठा जप्त, आरोग्याशी खेळणाऱ्यांची खैर नाही, राज्यातील सात जिल्ह्यात धडाका!

Donald Trump: फक्त 'या' एका मुद्द्यावरुन अमेरिका-इराणचा सामंजस्य करार रखडला; दोन तासांच्या बैठकीनंतर व्हाईट हाऊसने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT